Maharashtra Politics: 'त्यांचं टार्गेट OBC नाही, Devendra Fadnavis आहेत', Bhujbal यांचा हल्लााबोल

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले असून, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यांच्याबाबत परस्परविरोधी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणविस आहे', असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. काहीजण जाणीवपूर्वक फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला. याउलट, मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय', असे म्हणत जरांगे-पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. फडणवीसांना बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola