Morning Prime Time : Superfast News : 7.30 AM : सुपरफास्ट बातम्या : 18 OCT 2025 : ABP Majha
Continues below advertisement
बीड (Beed) येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार सभेत (OBC Maha Elgar Rally) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि जातनिहाय जनगणनेच्या (Caste Census) मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. 'हे थांबवलं नाही तर लक्षात ठेवा, तुम्हीच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे, हा डीएनए कधी सरकेल काही सांगता येणार नाही,' असा थेट इशारा छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला दिला आहे. भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी समाजात अंतर निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचा आरोप केला. दुसरीकडे, जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकल्याचे म्हटले आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी 'अंगावर आलं तर शिंगावर घ्या' असे म्हणत नाव न घेता जरांगेंवर टीका केली, तर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे (Gangadhar Kalkute) यांनी १९९४ चा जीआर (GR) जाळल्याने वाद आणखी चिघळला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement