Nana Patole यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं सोनिया गांधींना पत्र
नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर करा अशी मागणी भाजपने केलीय. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून ही मागणी केलीय. गोडसेने महात्मा गांधींचा वध केला असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी मोदींबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यांवरुन टीका करत बावनकुळे यांनी ही मागणी केलीय. नाना पटोले समाजविघातक वक्तव्यं करून सामाजिक शांतता बिघडवत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलाय. राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्र यावे हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. याच भावनेतून पत्र लिहित असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय.
Tags :
Nana Patole Chandrashekhar Bawankule Nana Patole Statement Nana Patole Bjp Nana Patole Gandhiji Nana Patole Chandrashekhar Bawankule Chandrashekhar Bawankule On Nana Patole