Chandrashekhar Bawankule Meet Bacchu Kadu : बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक टाळली, चंद्रशेखर बावनकुळे चर्चा करणार
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे (Farmers Protest) सरकारची कोंडी झाली आहे. 'निश्चित चर्चेनं लवकरच काहीतरी तोडगा निघणार,' असे आश्वासन देत सरकारने मध्यस्थीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना पुढे केले आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक नाकारल्याने हे आंदोलन अधिकच चिघळले आहे. कडू यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद महामार्ग रोखला गेला असून, शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून, चंद्रशेखर बावनकुळे हे आंदोलकांशी चर्चा करणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement