Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha : बावनकुळे यांना संधी; नागपूर मध्यची जागा कुणाला?

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha : बावनकुळे यांना संधी; नागपूर मध्यची जागा कुणाला? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात भाजपने बाजी मारली.. ९९ उमेदवारांची पहिली यादी भाजपने आज जाहीर केली... भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंंना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय.. कामटीमधून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापण्यात आलंय.. तर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांना पुन्हा उमेदवारी मिळालीय.. भाजपने जाहीर केलेल्या आजच्या पहिल्या यादीत १३ महिलांना संधी देण्यात आलीय..  नुकताच काँग्रेसमधून भाजपत आलेले अशोक चव्हाणांंची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून तिकीट देण्यात आलंय.. यंदांच्या निवडणुकीत अनेकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.. मात्र, आज जाहीर झालेल्या यादीनुसार पक्षाने अनेक आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचं पाहायला मिळतंय... भाजपच्या आणखी दोन उमेदवार येणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram