Chandrashekhar Bawankule on Opration Lotus : आम्हाला ऑपरेशन लोटस राबवण्याची गरज नाही

Continues below advertisement

भाजप महाविकासआघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे.. विधानसभेतील दारुण पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवले जाणार असल्याची चर्चा असून शरद पवारांचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे.. 

महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल का हा सध्या उत्कंठेचा विषय आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे केले जातायत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय तर विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव देणार नाही अशी भूमिका घेतलीय. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही अजून कुणाचा अर्ज आला नाही असं स्पष्ट केलंय..

विरोधकांकडे विरोधी पक्षनेता व्हावं एवढं संख्याबळच नाही, असं सत्ताधारी म्हणतायत तर विरोधक विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांच्या संख्येची गरज नाही असं म्हणतायत. शिवसेनेचे भास्कर जाधव तर तसा नियम दाखवा असं आव्हानच देतायत. ही चर्चा सुरु असताना आम्ही इतिहासात डोकावून पाहिलं. संख्याबळ नसताना १० वेळा विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा मान दिल्याचं यातून दिसून आलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram