Farmers Agitation | चंद्रपुरात कापूस खरेदी आंदोलन पेटले, शेतकऱ्यांनी तेलंगणाला जाणारा महामार्ग रोखला

चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत उग्र आंदोलन केले. पावसाळा तोंडावर असताना कोरोना संकटामुळे विक्री करु न शकलेला कापूस शेतकरी सध्या खरेदी केंद्रांवर आणत आहेत. मात्र सरकारच्या ढिसाळ नियोजनाने संतापात भर पडल्याने चंद्रपूर-आदिलाबाद महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने अडचणीची स्थिती उद्भवली होती. जिल्ह्यातील बाजार समिती आणि सीसीआय मार्फत सुरु असलेली खरेदी केंद्रे शेतकऱ्यांच्या रोषाचे कारण ठरले आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola