Chandrapur Primary School : 20 महिन्यांनंतर चिमुकले शाळेत, विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यात आज तब्बल पावणे दोन वर्षांनंतर प्राथमिक शाळेत पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाला आहे. आजपासून जिल्ह्यात कोविड खबरदारी घेत वर्ग 1 ते 4 च्या 2417 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
ज्यामध्ये 121226 विद्यार्थी शिकतायत. प्राथमिक शाळेतील या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा थेट शिक्षणाच्या प्रवाहात आणणे पालका-शिक्षकां पुढे आव्हान असणार आहे. काही शाळांनी शाळा दोन सत्रात राबवण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी अशी व्यवस्था केली आहे. या पुढच्या काळात या सर्व कोविड खबरदारीचे काय परिणाम दिसतील याकडे पालक-शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement