Chandrakant Patil: लोकसभेत उद्धव ठाकरेंनी खूप मेहनत घेतली : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil on Uddhav Thackeray : मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नेतृत्व एक आश्वासक नेतृत्व आहे नरेंद्र मोदी यांना कमी जागा मिळाल्या त्यामुळे संपूर्ण जग हळहळलंय, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. तसेच, शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) सरकार पडण्याविषयी वारंवार बोलायचे, पण त्याचा काही फरक पडला नाही, आता विधानसभा तीन महिन्यांवर आलेली आहे, त्यामुळे त्यांनी म्हटलं म्हणून काय होणार आहे असं काहीही नाही, असंही ते म्हणालेत. त्याचप्रमाणे, लोकसभेमध्ये सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली, पण काय मिळालं, त्यांच्या हाताशी काय लागलं? असं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil News) म्हणाले आहेत.
भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना जास्त यश मिळालं असं वाटतंय. लोकसभेमध्ये सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. काही ना काही आजारपणं असतात, तशी त्यांचीही आजारपणं होती. पण ते खूप फिरले. त्यांना 9 सीट मिळाल्यात, 2019 ला सरकार कंटिन्यू झालं असतं, युती कंटिन्यू झाली असती. त्यांच्या मात्र यंदा 13 आणि आठ सीट्स झाल्या. उद्धव ठाकरेंनी याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी काय मिळवलं? हाताशी काय लागलं? एका बाजूला अल्पसंख्यांकांच्या मतांवर निवडून आलेले असा ठपका बसला."