Chandrakant Patil :राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

राज्यपालांच्या (Governor Bhagatsingh Koshyari) अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे. नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात. दोनदा पत्र देऊन देखील तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. असं करणं त्यांनी राज्यपालांचा किंबहूना घटनेचा अपमान केला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते, असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील, असं पाटील म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram