Pune Land Scam: 'अजित पवारांशिवाय एवढा मोठा घोटाळा शक्य नाही', चंद्रकांत हंडोरेंचा थेट आरोप

Continues below advertisement
पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यावरून (Pune Land Scam) राजकारण तापले असून खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांनी थेट अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे, तर दुसरीकडे कोकणात (Konkan) नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena) गटांच्या संभाव्य युतीवर इशारा दिला आहे. हंडोरे यांनी आरोप केला आहे की, 'दोन हजार कोटीची शासकीय जमीन तीनशे कोटीला देण्याचा जो घाट घातला आहे, निश्चितपणे याच्या मागे भूमिका अजित पवारांची आहे'. या प्रकरणी हंडोरे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून या वादाला दिल्ली दरबारी नेले आहे. हा घोटाळा महार वतनाच्या जमिनीशी संबंधित असून, सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, कणकवलीत (Kankavli) उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटात युती होण्याच्या चर्चेमुळे नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. शिंदे आणि ठाकरे एकत्र आल्यास शिवसेनेशी संबंध तोडू, असा थेट इशारा राणेंनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola