Chandrahar Patil On Maharashtra Kesri| लाथ घालून शिवराज चुकलाच, अशा पंचांना गोळ्याच घालायला हव्या

Chandrahar Patil On Maharashtra Kesri| लाथ घालून शिवराज चुकलाच, अशा पंचांना गोळ्याच घालायला हव्या

Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगर येथे झालेली 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात (Maharashtra Kesari 2025 Controversy) सापडली आहे. यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) यांच्यात झालेल्या कुस्तीचा निकाल सदोष असल्याचा आरोप शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांचे प्रशिक्षक आणि भावाने केला आहे. एवढेच नाही तर शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक कोटीचे बक्षीस देईल, असं शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल (Randhir Pongal) यांनी जाहीर केल आहे.

तसेच काका पवार तालमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर शिवराज राक्षे यांचे भाऊ युवराज राक्षे यांनी शिवराज राक्षेच्या अनेक कुस्त्यांचे दाखले देत शिवराजच्या खेळ आणि स्वभाव सांगत पंचांनी दिलेला चुकीचा निर्णय आहे असं म्हंटल आहे. शिवराजला पंचांकडून शिवीगाळी झाल्यामुळेच त्यावर पंचाला लाथ मारण्याची वेळ आली असं युवराज राक्षे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवराज राक्षेचा भाऊ युवराज राक्षे आणि कोच रणधीर सिंह पोंगल यांच्याशी बातचीत केली असता ऐकूणच त्यांनी या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola