Pandharpur : विठूरायाच्या भक्तांसाठी खूशखबर, चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणाचे काम अखेर सुरु
विठ्ठल भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम आता सुरु झालं आहे. नमामि चंद्रभागा प्रकल्पाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात सात गावात नदीत मिसळणारे सांडपाणी बंद करण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर, गुरसाळे या दोन गावात नमामि चंद्रभागा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी आणि घाण मिसळल्याने चंद्रभागा अर्थात भीमा नदी प्रदूषित झाली. यासाठी चंद्रभागा नदीच्या काठावर 120 गावात स्वच्छ भारत मिशन योजनेतून शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन ही कामं हाती घेतली जाणार आहेत.
Tags :
Pandharpur Chandrabhaga River Chandrabhaga Chandrabhaga Namami Namami Chandrabhaga Pandharpur Namami