Kokan Rain : कोकणात मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावासाची शक्यता, आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत
Continues below advertisement
येत्या ४८ तासात राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.. येत्या 48 तासांत राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह विदर्भातल्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे.. वातावरणातल्या या बदलामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय.. सांगली, पंढरपूरमध्ये द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्याही चिंता वाढली आहे.
Continues below advertisement