Chagan Bhujbal Full PC Manoj Jarange : लाख-कोटीमधील फरक कळेना अन् मंडल आयोग संपवण्याची भाषा करतात

Continues below advertisement

Chagan Bhujbal Full PC Manoj Jarange : लाख-कोटीमधील फरक कळेना अन् मंडल आयोग संपवण्याची भाषा करतात
लाख-कोटीमधील फरक कळेना अन् मंडल आयोग संपवण्याची भाषा करतात; भुजबळांची जरांगेंवर टीका   मुंबई : ओबीसी आरक्षण (OBC Reservation)  रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करावी आणि आवाज उठवावा, माझं त्यांना थेट आव्हान असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. ज्यांना लाख आणि कोटीमधील फरक कळत नाही ते आता मंडळ आयोगाला संपवण्याची भाषा करतायत असेही भुजबळ म्हणाले.   मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याने आम्हाला देखील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. जरांगे यांच्या याच इशाऱ्यानंतर भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "जरांगे मंडळ आयोगाला आव्हान देणार म्हणतात, त्यांनी आव्हान द्यायलाच पाहिजे. त्यांच्या एवढा न्यानी हिंदुस्तानमध्ये कोणी आहे का?, कारण ते ताकदवर खूप आहेत. तीन कोटी मराठा मुंबईत आणणार होते. वाशीमधील ते कोटी सर्वांनी बघितले. ज्याला लाख आणि कोटीमधील फरक समजत नाही अशी माणसं मंडळ आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहेत. त्यांनी ते आवश्यक करावं, त्यांची हिंमत असेल तर त्यांनी मंडळ आयोगाला विरोधात आवाज द्यावा, तसेच मंडळ आयोगावर कारवाई करावी. हिंमत असल्यास मंडळ आयोगाला संपवण्याचं त्यांनी काम करून दाखवावं, त्यांना माझं चॅलेंज असल्याचे भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram