CEO Sundar Pichai आणि पोलंडचे पंतप्रधान यांची भेट, Ukraine नागरिकांना मदत करण्यासंदर्भात चर्चा
Continues below advertisement
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि पोलंडचे पंतप्रधान मॅट्युझ मोराविकी यांची नुकतीच भेट झालीय. पोलंड हा युक्रेनचा शेजारी देश आहे. अशा परिस्थितीत रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात पिचाई आणि पोलंडचे पंतप्रधान यांच्यातील बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमध्ये युक्रेनियन नागरिकांना मदत करण्यासंदर्भात चर्चा झालीय.
युक्रेन हल्ल्याशी संबंधित रशियाचा खोटा प्रचार थांबवण्यावर आयटी कंपन्या भर देत असल्याचे पिचाई यांनी सांगितले. तर गुगलकडून रशियन सरकार-अनुदानित चॅनेल आणि अॅप ब्लॉक करण्यची घोषणा करण्यात आलीय.
Continues below advertisement