Central Railway : नवीन वर्षात मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा, मध्य रेल्वे पाच मोठे ब्लॉक घेणार
मध्य रेल्वे मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ठराविक अंतरानं मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉकदरम्यान रेल्वे रुळांच्या कापणी आणि जोडणीची कामं केली जाणार आहेत. आठवडा अखेरीस हे एकूण पाच मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाचवी आणि सहावी मार्गिका त्वरित सुरू करण्याचं नियोजन आहे. या मेगाब्लॉकच्या काळात वेळापत्रकं बदलतील तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले जातील असं रेल्वे प्रशासनानं सांगितंलय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र मध्य रेल्वे नवीन वर्ष ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नवीन वर्ष