Rajesh Tope on Mucormycosis: म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन महाराष्ट्राला द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
म्युकरमायकोसिसनं राज्यात 90 मृत्यू झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या रोगावरील 'अम्फोटेरिसिन बी' इंजेक्शन जास्त द्यावं अशी मागणी टोपेंनी केली आहे. पैसे आम्ही देऊ पण केंद्रानं 'अम्फोटेरिसिन बी' औषध पुरवावं, असं ते म्हणाले.