Jalyukt Shivar : देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोज्केट असणाऱ्या Jalyukt-Shivar ला सरकारची क्लीन चिट

Continues below advertisement

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचारासह अन्य आरोप झाल्यानंतर आता या योजनेला क्लीनचिट मिळाली आहे. सुरुवातीपासूनच जलयुक्त शिवार हे तांत्रिक दुरुस्त्या नापास झालेलं अभियान आहे, अशी टीका झाली होती. शिवाय जलयुक्त शिवारच्या कामातल्या गैरव्यवहारावर काही चौकशी समित्या स्थापन झाल्या होत्या. आता 'जलयुक्त'ला सरकारकडूनच क्लीन चिट मिळाली आहे. याबाबत जलसंधारण विभागाचा अहवाल समोर आला आहे. 'जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा' झाली असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे.

जलसंधारण विभागाच्या अहवालात या योजनेमुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असल्याचं म्हटलं आहे.  1,76,284 पैकी 58 हजार जलयुक्तच्या कामांचं मूल्यमापन केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram