Celebrity Bappa : कलेच्या अधिपतीची कलाकारांकडून आराधना; सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCelebrity Bappa : कलेच्या अधिपतीची कलाकारांकडून आराधना; सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा
रायगडसह कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होतोय. शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यातील मूळ जन्मगाव असलेल्या पिंपळवाडी येथील निवास स्थानी आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी गणरायाला साकडे घातले. बाप्पा आतापर्यंत जो कृपाशीर्वाद सर्वांवर ठेवला तोच कृपाशीर्वाद यापुढही राहूदे. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार जनतेच्या हिताचे काम करतय. जनतेच भल करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेत येऊ दे,मला सुध्दा पुन्हा चौथ्यांदा विजयी कर असे साकडे आमदार भरत गोगावले यांनी बाप्पा चरणी घातले. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठी माणूस जर गेला तर तो तिथे गणेश उत्सव नक्कीच साजरा करतो. लक्षदीप बेटावर पहिल्यांदाच गणेशोत्सवची धूम पहायला मिळते. लक्षद्वीप हा 36 बेटांचा समूह. यातील दहा बेटावरच मानवी वस्ती आहे. ती फक्त 80 हजार. 32 स्क्वेअर किलोमीटरचा हा परिसर. येथील लोकसंख्येत 95 टक्के मुस्लिम समाज आहे.