Bakri Eid Guidlines : बकरी ईद साधेपणाने साजरी करा, 'या' आहेत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2021 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या वर्षीपासून सर्व सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम आणि सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी अद्यापही धोका कायम आहे. येत्या 21 जुलै रोजी 'बकरी ईद'चा सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.