Sameer Wankhede CBI Inquiry : Aryan Khan च्या अटकेवळी CCTVच छेडछाड? CBI करणार चौकशी
दरम्यान, आर्यन खानची चौकशी आणि अटके दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, याचाही तपास समीर वानखेडेंच्या चौकशीत सीबीआय करणार आहे. कारण 02 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेजच उपलब्ध नाहीये. 25 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीचं एसआयटी पथक मुंबई एनसीबी कार्यालयात पोहोचलं होतं. आर्यन खान प्रकरणाचा तपास कसा करण्यात आला, हे जाणून घेण्यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागवलं. मात्र सीसीटीव्ही आणि त्याचा डीव्हीआर करप्ट झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. सीसीटीव्हीची वायर उंदरानं कुरतडली, असं कारण एनसीबी कार्यालयाकडून देण्यात आलं. पण या कारणावर सीबीआयचा विश्वास नाही. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज गहाळ कसं झालं, याचाही तपास सीबीआय करणार आहे.