CBI clean chit report leak : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरुद्ध आरोपपत्र दाखल
Continues below advertisement
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध खंडणी प्रकरणात २०२१ मध्ये 'क्लीन चिट' देणाऱ्या एजन्सीचा अंतर्गत मसुदा अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांची कन्या पूजा आणि सून राहत यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. तसंच या अहवालाचा मसुदा मिळविण्यासाठी पूजाने देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना एजन्सीचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देण्याचे निर्देश देण्यात आले होते. देशमुखांविरुद्धचा तपास खिळखिळा करण्यासाठी २९ ऑगस्ट २०२१ रोजी हा अहवाल प्रसारमाध्यमांसमोर लीक करण्यात आला होता असा सीबीआयकडून आरोप करण्यात आला होता.
Continues below advertisement