Amravati : मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल
अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रवी राणा आणि इतर 11 आरोपींवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणात पोलीसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्यानं आयुक्तांवर काल शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Tags :
Police Ravi Rana Amravati Municipal Corporation Navneet Rana Shaifek Rajapeth Flyover Shivaji Statue