Prakash Ambedkar ON Manoj Jarange : मनोज जरांगेंना अंतर्गत वादातून धमकी : प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी हत्येच्या कटाचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अरे हे इंटरनल त्यांचे भांडण आहे, त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजय ला इन्वॉल्व केलंय,' असे म्हणत अजित पवारांनी या वादाला वेगळे वळण दिले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आरोप केला आहे की, धनंजय मुंडे यांनी त्यांना संपवण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली होती. या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून, अजित पवार यांच्या प्रतिक्रियेमुळे आता या वादात नेमके कोणते अंतर्गत राजकारण आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement