Kolhapur | पावनगडावर सापडले शेकडोंच्या संख्येने तोफगोळे

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळगडाच्या अगदी बाजूलाच असलेल्या पावनगडावर शिवकालीन शेकडो तोफगोळे सापडले आहेत. संपूर्ण देशभरातील पर्यटक पन्हाळागडावर येतात. मात्र त्याच बाजूला असलेल्या पावनगडाबाबतीत खूप कमी पर्यटकांना माहिती आहे. हा गड स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला आहे. याच गडावर टीम पावनगड दिशादर्शक आणि माहिती देणारे फलक लावत होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यासंदर्भातले काम सुरू होतं. आज सकाळी महादेव मंदिराच्या समोर दिशादर्शक फलक लावत असताना तोफेचे गोले सापडले. आणखी काही खोदल्यानंतर हजारो गोळी याठिकाणी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या टीम पावनगड यांनी काढलेले तोफगोळे 406 इतके झाले आहेत. महाराष्ट्रात एखाद्या किल्ल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्खनन होऊन शेकडो वर्षे मातीखाली लपलेला ऐतिहासिक ठेवा जगासमोर आणण्याची गरज आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram