CAG Report | सिडकोच्या कामावर गंभीर ताशेरे, नवी मुंबई विमानतळाच्या कामातही अनियमितता
Continues below advertisement
कॅगच्या अहवालामध्ये सिडकोच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅगचा अहवाल आज विधानसभेत मांडला. त्यात भाजप सरकारच्या कारभारावर ठपका ठेवला आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. तर सिडकोने पायाभूत सुविधा कामावर केलेला खर्च 2013-14 मधील 706.04 कोटींवरून 2017-18 मध्ये 920.10 कोटी रुपयांनी म्हणजे तब्बल 30 टक्क्यांनी वाढला असल्याचे देखील अहवालात म्हटलं आहे. हा खर्च अंदाजपत्रकाच्या तुलनेत जवळ जवळ 61 टक्के इतका होता, असं देखील यात म्हटलं आहे. दरम्यान याविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, कॅगच्या अहवालात 2013 एप्रिलपासून 2018 पर्यंतच्या सिडकोच्या विविध कामांचे अवलोकन केलेलं आहे. रिपोर्ट येण्याआधीच सिलेक्टिव्ह लिकेज झालं ते सुद्धा आक्षेपार्ह आहे, असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement