Maratha Reservation Protest : वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू : हसन मुश्रीफ

"मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती. ", असं हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले. कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भापवर निशाणाही साधला. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार,  वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, अशी ग्वाहीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola