Butterflies : खान्देशात फुलपाखरांच्या 8 नव्या प्रजाती, प्रदूषण घटलं, जैव साखळीला फायदा
Continues below advertisement
लॉकडाऊनच्या काळात हवामानातील प्रदूषणाची पातळी कमी झाली. पण याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणातील जैव साखळीवर होताना पाहायला मिळताय. खान्देशात कधीही आढळून न आलेल्या ८ फुलपाखरांच्या प्रजाती या नव्याने आढळून आल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. जळगाव शहरातील फुलपाखरू अभ्यासक उमेश पाटील यांनी गेल्या ६ महिन्यांत खान्देशातील अनेक भागातील फुलपाखरांचं सर्वेक्षण केलं. यात ब्लू मॉर्मन, रेड हेलन, ब्लू ओक लिफ,गोल्डन अंगल, पॉइंट्स सिलेट ब्लू, कॉमन रेड आय, डार्क इविनिंग ब्राऊन, हिमालय कॉमन बेरोन, दख्खन कॉमन बेरान या ८ प्रजातींची फुलपाखरं आढळून आली.
Continues below advertisement