Chandrapur : कोळशाच्या तुटवड्यामुळे विदर्भातील उद्योगांना ऐन दिवाळीत पुन्हा एकदा ब्रेक ?
Continues below advertisement
राज्यात अनलॉकनंतर हळूहळू उद्योगधंदे सुरळीत होण्यास सुरुवात झाली. मात्र या उद्योगांना ऐन दिवाळीत पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी देशात कोळशाच्या टंचाईमुळे वीज उत्पादन क्षेत्रापुढे मोठं संकट निर्माण झालं असून देश अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली. मात्र सरकारने तातडीने कोळसा खाणीतील सर्व कोळसा वीज केंद्रांकडे वळता केला, त्यामुळे वीज संकट टळलं मात्र राज्यातील उद्योगांपुढे वीज संकट उभं ठाकलंआहे. कोळशाच्या तुटवड्यामळे विदर्भातील चारशे छोटे-मध्यम उद्योग आणि 25 मोठ्या उद्योगांपुढे समस्या निर्माण झाली आहे.
Continues below advertisement