Bullock Cart Race वरची बंदी उठवण्यासंदर्भात राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी
Continues below advertisement
महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवरील असलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या याचिका ऐकायची विनंती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलीय. हायकोर्टानं २०१७ साली बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. आता राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement