Bull Fight competition | सिंधुदुर्गात बैल झुंजीच्या स्पर्धा
बैलांच्या झुंजींना सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना सिंधुदुर्गात अनधिकृतरित्या बैलांच्या झुंजीच्या स्पर्धा सुरु होत्या.. कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलांच्या झुंजी लावल्या जातात. कुडाळ तालुक्यातील नानेली गावात आज सकाळी 7 वाजल्यापासून बैलांच्या स्पर्धा सुरु होत्या. स्पर्धेच्या ठिकाणाहून पोलीस स्थानक अवघ्या हाकेच्या अंतरावर पोलिस स्थानक आहे. तरी, पोलिसांजवळ यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. यावेळी झुंज पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील अनेक गावातून बैल झुंजीसाठी येथे आणण्यात आले होते.