Karjat Bull Attack : कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाचा हैदोस, 'Arjun Mhase' यांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Continues below advertisement
कर्जतमध्ये (Karjat) एका पिसाळलेल्या बैलाने अक्षरशः हैदोस घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बैलाच्या हल्ल्यात अर्जुन म्हसे (Arjun Mhase) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बैलाने चालत्या मोटारसायकलला धडक दिल्याने अर्जुन म्हसे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. कर्जत शहरातील श्रीराम पुलाजवळ (Shriram Pul) ही घटना घडली. या पिसाळलेल्या बैलाने सकाळपासूनच परिसरात दहशत निर्माण केली होती आणि अनेक नागरिकांवर हल्ला केला होता. अखेर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खोपोलीहून (Khopoli) एका विशेष रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. मृत्यू झालेले अर्जुन म्हसे हे संजय नगरचे (Sanjay Nagar) रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola