Buldhana : नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचे हाल; रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी कसरत
बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भागातील समस्या आजही कायम आहेत. जळगावजामोद तालुक्यातील सातळी गावाला जाण्यासाठी नदी पार करून जावं लागतं. परंतु पावसाळ्यात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावर इथल्या गावांचा संपर्क तुटतो आणि अशा परिस्थितीत रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आजही या गावातल्या एका ग्रामस्थाची तब्येत बिघडली आणि त्यामुळे त्याला रुग्णालयात नेताना ग्रामस्थांचे हाल झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून नदीवर पूल बांधून देण्यात यावा ही मागणी सातत्याने केली जात आहे पण अद्याप मागणी मंजूर न झाल्याने ग्रामस्थांचे हाल सुरुच आहेत.