Buldhana ST Workers Strike : एसटी कामगारांच्या काळजीपोटी कुटुंबीयांचा आंदोलनात सहभाग ABP Majha
बुलढाण्यातल्या खामगावात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वेगळं वास्तव पाहायला मिळालं. आंदोलनात सहभागी झालेला आपला पती जीवाचं बरं-वाईट तर करणार नाही ना? या भीतीपोटी एसटी कामगारांचे कुटुंबीय आंदोलनस्थळी बसलेत. कडाक्याच्या थंडीत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलं रात्रभर आंदोलन स्थळी बसल्याचं चित्र दिसलं. आंदोलनात सहभागी असलेला पती तीन दिवस घरी आला नाही आणि त्यानंतर त्याला निलंबित केल्याची बातमी आल्यानंतर त्यांची चिंता वाढली. त्यामुळे कामगारांच्या पत्नी मुलांना घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाल्या.
Tags :
Mumbai Sadabhau Khot Bombay High Court Msrtc High Court ST Strike Anil Parab Gopichand Padalkar State Transport Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest Buldhana St Workers Strike