ST Strike : Buldhana एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक पुकारला संप, भाऊबीजेला जाणारी मंडळी बस स्टँडवरच
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळ पर्यंत सुरळीत सुरू असलेली एस.टी. बस सेवा अचानक एस.टी. कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे ठप्प झाली आणि यामुळे मात्र भाऊबीजेला जाणाऱ्या अनेक बहिणी बस स्टँडवर अडकून पडल्याचं दिसून आलं. राज्यात एसटी कर्मचाऱयांचा अनेक ठिकाणी संप सुरू आहे पण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व एसटी सेवा आज सकाळीही सुरळीत सुरू होती यामुळे प्रवासी व भाऊबीजेला जाणाऱ्या हजारो महिला घरून निघाल्या पण बस स्टँडवर गेल्यावर अचानक जिल्ह्यातील मेहकर , चिखली येथील एसटी कर्मचाऱयांनी अचानक संप पुकारल्याने एसटी सेवा ठप्प झाली आणि हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.
Continues below advertisement