Buldhana : शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा असलेल्या शिंगणेंकडून पवारांचीच खिल्ली ?

Continues below advertisement

Buldhana : शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा असलेल्या शिंगणेंकडून पवारांचीच खिल्ली ?

हेही वाचा : 

निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशातच राजकीय पक्षांत जागावाटप, उमेदवार, मतदारसंघ दौरे, सभा, पक्षांतर या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात भाजप व मनसेला धक्का मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते व माजी आमदार धृपतराव सावळे व मनसेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने निवडणुकीसाठी मोठी तयारी करत असतानाच भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात मोठ्या राजकीय उलथापालथ बघायला मिळत आहे. बुलढाण्याचे माजी आमदार व भाजपचे जेष्ठ नेते धृपतराव सावळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठलराव लोखंडकार यांनी काल सायंकाळी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बुलढाणा जिल्ह्यात बळ मिळाल्याचे चित्र आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram