Buldhana : संग्रामपूर आणि ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर, कर्मचारी नाही, 2 महिलांची रिक्षात प्रसुती
Continues below advertisement
बुलढाण्यातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे काल एका महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच करावी लागली. तर आज संग्रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार समोर आला. संग्रामपूर आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे रुग्णालयाच्या शेजारील घरात महिलेची प्रसुती करण्याची वेळ ओढावली आहे. या महिलेला तब्बल दोन तास प्रसुती वेदना सहन कराव्या लागल्या. या घटनांबाबत आम्ही नातेवाईकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय कुलूपबंद आहेत. दरम्यान या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Buldhana