Defender Politics: बुलढाण्यात दीड कोटींच्या डिफेंडर गाडीवरून नवा वाद
Continues below advertisement
बुलढाण्यामध्ये (Buldhana) दीड कोटींच्या डिफेंडर (Defender) गाडीवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांच्यात नवा वाद पेटला आहे. 'दीड कोटींच्या डिफेंडर गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे, ती कोणत्या कामातील कमिशनमुळे लोकप्रतिनिधीला मिळाली?', असा गंभीर सवाल विजय शिंदेंनी उपस्थित केला आहे. या आरोपांवर उत्तर देताना, ती गाडी आपला नातेवाईक आणि पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या निलेश ढवळे यांची असून ती शंभर टक्के कर्जावर घेतली असल्याचे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले. दरम्यान, संभाजीनगरमधील नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या गाड्याही अनुक्रमे सागर पवार आणि संजय भंडारी या कंत्राटदारांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना, अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) शिंदे यांच्यावर टीका करत, 'त्यांच्याच सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या गुत्तेदाराच्या नावावर आहेत,' असे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement