Voter List Row : बोगस मतदार: सत्ताधारी आमदारांचा निवडणूक आयोगावरच हल्लाबोल
Continues below advertisement
बोगस आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan), संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. 'हे पैसे घेऊन नोंदणी करतात', असा थेट आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात लाखापेक्षा अधिक बोगस नावे असल्याचा आरोप केला आहे, ज्यात मयत आणि स्थलांतरित नागरिकांचा समावेश आहे. मयत होऊन अनेक वर्षे झाली तरीही त्यांची नावे मतदार यादीत कायम असल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी एकाच विधानसभा मतदारसंघात छत्तीस हजार नावे दुबार असल्याचा दावा केला आहे. आमदारांनी हा मुद्दा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांच्याकडे मांडला असून, मतदार याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement