
Bopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
Bopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
बोपदेव सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल आहेत. त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. गुरुवारी मध्यरात्री २१ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर कुठल्याही सी सी टी व्ही मधे ते साडशपडू नयेत यासाठी त्यांनी दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. घाटाच्या मधोमध सामुहिक बलात्काराची घटना घडल्यावर आधी ते बोबदेव घाटाच्या वरच्या भागात गेले, तिथुन काही वेळाने त्याच रस्त्याने घाट उतरुन कोंढवा भागात आले. कोंढवा भागात अनेक वेगवेगळ्या रस्त्यांनी त्यांनी ट्रीपल सीट प्रवास केला. जेणेकरुन सी सी टी व्हीची साखळी तुटावी. मात्र पोलीसांना तपास करताना कोंढवा भागातील एका व्यक्तीने या तिघांना ट्रीपल सीट फिरताना पाहिल्याचे सांगितले. पोलीसांनी त्या दिशेने तपास केला आणि पुण्याजवळील ग्रामीण भागातुन काल एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्याच्या दोन साथिदारांकडे देखील चौकशी सुरु आहे.