Mumbai High court On Manoj Jarange : मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगेंसह मुंबई पोलिसांना बजावली नोटीस

Continues below advertisement

मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगेंसह मुंबई पोलिसांना नोटीस बजावली. गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंच्या मोर्चाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली. तर सुनावणी दरम्यान कोर्टानं सरकारला देखील खडे बोल सुनावले. मोर्चादरम्यान जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, लाखो आंदोलक, हजारो बैलगाड्या आणि वाहनं मुंबईत आल्यास काय करायचा, हा सरकारचा निर्णय आहे असंही कोर्टानं म्हटलं.. त्यामुळे आता मराठा आंदोलन मुंबईत धडकण्याचा मार्ग एकप्रकारे मोकळा झाला आहे. मात्र याप्रकरणी हायकोर्टानं मनोज जरांगे-पाटील आणि मुंबई पोलिसांना नोटीस जारी करत दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश जारी केलेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram