Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात भरती, दाखले कोर्ट निर्णयावर अवलंबून
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात भरती, दाखले कोर्ट निर्णयावर अवलंबून मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा असं कोर्टाने राज्य सरकारला बजावलंय. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला हे स्पष्ट निर्देश दिलेत. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केलीय. राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेली भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिरांतींविरोधात डॉ. जयश्री पाटील यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केलीय. भरती प्रक्रिया सुरू केली म्हणजे नियुक्त्या किंवा दाखले दिले असा त्याचा अर्थ होत नाही असं महाधिवक्त्यांनी कोर्टात म्हटलं. या याचिकांवरही इतरांसोबत सुनावणी घ्यायची की तातडीच्या दिलाश्याकरता स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.