Illegal Arrest: 'अनिलकुमार पवार यांची अटक बेकायदेशीर', Bombay High Court चा ED ला दणका
Continues below advertisement
वसई-विरारचे माजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अटक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पवार यांची अटक बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. '१३ ऑगस्ट रोजी अनिलकुमार पवार यांना अटक करत असताना अटक अधिकाऱ्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध नव्हते', असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. वसई-विरारमधील ४१ अनधिकृत इमारतींच्या बांधकाम प्रकरणी पवार यांना अटक करण्यात आली होती. ही अटक मनमानी आणि असंवैधानिक असल्याचा दावा करत पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना, न्यायालयाने ईडीची कारवाई चुकीची ठरवून संपूर्ण प्रक्रिया रद्द केली आहे. ईडीने या आदेशाला स्थगिती देण्याची केलेली मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement