BMC Ward Delimitation | मुंबई प्रभाग रचना 2017 प्रमाणेच, 6 ऑक्टोबरला अंतिम आराखडा
मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2017 च्या निवडणुकीनंतर प्रभाग रचनेत फारसे बदल होताना दिसत नाहीत अशी सद्यस्थिती आहे. महापालिकेतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "दोन हजार सतरा प्रमाणेच प्रभाग रचना कायम राहील." कोस्टल रोड आणि मेट्रोसारख्या विकासकामांमुळे प्रभाग रचनेत किरकोळ बदल होतील असेही सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्यानंतर, 6 ऑक्टोबरला हा आराखडा अंतिम स्वरूप घेणार आहे. यामुळे मुंबईतील आगामी निवडणुकांसाठी प्रभाग रचना जवळपास निश्चित झाली असून, पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.