BMC Election Mahayuti : मुंबई मनपा निवडणूक: महायुतीत जागांवरून रस्सीखेच सुरू

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरून संघर्ष पेटला आहे. भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena) सुमारे ५० जागांवरून तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून 'निम्मे निम्म्यांची जी ओरड आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळतंय', तर दुसरीकडे भाजपने 'मिशन १५०' जागांचा नारा दिला आहे. दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर आणि गोरेगाव यांसारख्या पश्चिम उपनगरातील जागांवर हा वाद प्रामुख्याने केंद्रित आहे, जिथे मागील निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा पराभव केला होता. हेच ४४ नगरसेवक आता शिंदे गटात सामील झाल्याने या जागांवर दोन्ही पक्षांनी हक्क सांगितला आहे. महापौरपद मिळवण्यासाठी पश्चिम उपनगरातील जागा जिंकणे महत्त्वाचे असल्याने, दोन्ही पक्ष बूथ पातळीवर मोर्चेबांधणी करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola