Satara Phaltan Doctor Case: 'पोलिसांनीच पोलिसांना मदत केली का?' PSI बदने 48 तास फरार, अखेर शरण

Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात (Doctor Suicide Case) मुख्य आरोपी PSI गोपाल बदने (Gopal Badner) अखेर पोलिसांना शरण आला आहे. 'पोलिसांनीच पोलिसांना मदत केली का?' असा सवाल आता उपस्थित होत आहे. बुधवारी डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर बदने फरार झाला होता. त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर येथे असूनही, पोलीस त्याला पकडण्यात अयशस्वी ठरले. अखेर ४८ तासांनंतर तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बदनेला फरार होण्यासाठी कोणी मदत केली का आणि यात पोलिसांचा सहभाग होता का, याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola