Eknath Shinde BMC : 2017 ला जिंकलेल्या जागा आम्हाला मिळाव्यात, शिंदेंची महापालिकेसाठी मागणी
Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'आपल्याला महायुतीतच लढायचं आहे', असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी, जागावाटपात कोणताही त्याग करण्याची तयारी नसल्याचे दिसून येते. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी आता 50 ते 60 नगरसेवक शिंदे गटासोबत आहेत. याच जिंकलेल्या जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. उर्वरित जागा भाजपसोबत समान वाटून घेण्याची मागणी आहे, ज्यामुळे शिवसेनेची एकूण मागणी 100 पेक्षा जास्त जागांवर पोहोचली आहे. यामुळे 82 जागा जिंकलेल्या भाजपसोबत (BJP) जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement