BMC Elections Shinde Shiv Sena: 'जागा एक, इच्छुक अनेक'; 110-114 जागांचा प्रस्ताव

Continues below advertisement
शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत सर्वे सुरू करण्यात आला आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती शिवसेनेच्या अनेक वॉर्ड्समध्ये निर्माण झाली आहे. निवडून येऊ शकतात अशांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन 110 ते 114 जागांच्या मागणीचा पहिला प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 123 माजी नगरसेवक आहेत. यामध्ये दोन हजार सतरा पूर्वीचे 65 माजी नगरसेवक आहेत. तसेच, दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस कालावधीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. याच कालावधीतले काँग्रेसचे 7, मनसेचा 1, सपाचे 2, एमआयएमचे 2 माजी नगरसेवक शिंदेंसोबत आहेत. दोन हजार सतरा पूर्वीचे शिवसेनेचे 32, भाजपाचे 2, काँग्रेसचे 19, राष्ट्रवादीचे 2, मनसेचे 6, सपाचे 1 आणि 3 अपक्ष सुद्धा शिंदेंसोबत आहेत. जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola