Blue Tick : फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर ब्ल्यू टीकसाठी मोजावे लागणार पैसे, झुकरबर्ग यांची घोषणा
abp majha web team
Updated at:
20 Feb 2023 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर ब्ल्यू टीक यावी असं प्रत्येकाला वाटत असतं.. यासाठी अनेकजण प्रयत्नही करत असतात. मात्र आता याच ब्ल्यू टीकसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली आहे...याआधी एलन मस्क यांनी ट्विटरवर ब्ल्यू टिक वापरणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली होती. यासाठी 11.99 डॉलर्स म्हणजेच 993 रुपये तर आयफोन वापरणाऱ्यांसाठी 14.99 डॉलर्स म्हणजेच 1 हजार 241 रुपये मोजावे लागणार आहेत. तूर्तास प्रीमिअम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशामध्ये या सेवेची सुरुवात केली जाणार आहे.